Posts

‘भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य उज्ज्वल’: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Image
भारतीय शास्त्रीय नृत्यकला ही शास्त्र शुद्ध गंधर्व विद्या असून नव्या पिढीमध्ये नृत्यकलांबद्दल विशेष आस्था दिसून येत आहे. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या योग, संगीत व कलेच्या सांस्कृतिक ठेव्याकडे गेले आहे. अश्यावेळी, नृत्यकलांचा प्रचार व प्रसार झाला व त्यात संशोधन झाले तर सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. श्री श्री सेंटर फॉर अडव्हांस्ड रिसर्च इन कथक, श्री श्री विद्यापीठ, कटक व इंदोर येथील नटवरी कथक नृत्य अकादमी यांनी संगीत नाटक अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या २ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कथक परिषदेचे उद्घाटन सोमवारी (दि. १) राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते.  मध्य प्रदेशच्या संस्कृती, पर्यटन व अध्यात्म मंत्री उषा ठाकूर, कथक गुरु महामहोपध्याय डॉ पुरू दधीच, श्री श्री विद्यापीठाच्या अध्यक्षा रजिता कुलकर्णी, कुलगुरू डॉ अजय कुमार सिंह, रतिकांत मोहपात्रा, विद्या कोल्हटकर, डॉ. मंजिरी देव तसेच कथक क्षेत्रातील संशोधक परिषदेला उपस्थित होते.   भारतीय कला व संस्...

टेस्ट फाईल

 टेस्ट फाईल

पोलिसांच्या “फोर्स वन” ला पूर्वीप्रमाणेच प्रोत्साहन भत्ता मिळणार !

Image
  ➽➤   “फोर्स वनचे शूर आपले संरक्षण करतात,आपण त्यांच्या आयुष्याची काळजी घेऊ”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. ६:-  विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या 'फोर्स वन' मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते. फोर्स वन प्रशिक्षण केंद्राशी निगडीत अन्य सुविधांबाबतही चर्चा-  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस बैठकीस  मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मनुकूमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृह विभागाचे प्रधान सचिव विनीत अगरवाल, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, अतिरिक्त पोलिस महासंचालक (फोर्स वन) सुखविंदर सिंग, अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. जगनाथन आदी उपस्थित होते. यावेळी फोर्स वन प्रशिक्षण क...

आता परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्ती, उर्वरित 21 लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी जाहीर

Image
  ➽➤  धनंजय मुंडे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय  ➽➤  मुंबई, दि. ६ -:  जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन घेतला आहे. परदेश शिष्यवृत्तीच्या पात्र २१ विद्यार्थ्यांची दुसरी यादी जाहीर-  परदेश शिष्यवृत्तीच्या पात्र २१ विद्यार्थ्यांची दुसरी यादीही आज सामाजिक न्याय विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करून जाहीर करण्यात आली आहे. अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या २७ जून २०१७ च्या सुधारित नियमावलीनुसार परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेत पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा अशी अट होती, कोविड-१९ च्या महामारीच्या जा...